:

आमचे इतर खेळ ही पहा

शब्दकोडे तयार करा
दैनिक मराठी शब्दकोडे
दैनिक मराठी अदलाबदली खेळ
×

शब्दभ्रमर - कसे खेळावे?

या खेळामध्ये खेळाडूला सुट्या अक्षरांपासून शब्द बनवायचे असतात. सर्व शब्द हे तीन अक्षरीच असावेत, आणि त्या सर्व शब्दांमध्ये मधल्या चौकोनातील अक्षर हे असलेच पाहिजे. मधल्या चौकोनातील अक्षर हे कोणत्याही जागी येऊ शकते.

शब्द तयार करण्यासाठी क्रमाने अक्षरे निवडा. त्यासाठी चौकोनावर टिचकी मारा. निवडलेले अक्षर रद्द करण्यासाठी त्याच चौकोनावर पुन्हा एकदा टिचकी मारा.

तीन चोकोन निवडल्यावर प्रोग्रॅम तो शब्द योग्य आहे कि नाही ते तपासेल. बरोबर शब्द स्क्रीन वर दिसू लागेल.

या खेळाच्या तीन काठिण्य पातळ्या आहेत. त्यामध्ये अनुक्रमे चार, आठ, आणि बारा शब्द बनवायचे असतात.

खेळ खेळून झाल्यावर दवंडी पिटावीत येते. त्यासाठी लाऊडस्पिकर च्या बटनावर टिचकी मारा.

हा खेळ तुमच्या शब्दज्ञानाची आणि तर्कशक्तीची परीक्षा पाहतो. भाषेची शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी आणि मनोरंजनासाठी हा उत्तम मार्ग आहे. हा खेळ कसा वाटला हे आम्हाला इमेल करून जरूर कळवा. (vegapoint@gmail.com)