वेगवेगळ्या रंगांच्या छोट्या चौकोनांचे एकाच रंगात रूपांतर करणे हा या खेळाचा हेतू आहे. त्यासाठी सर्व चौकोन एकमेकांना जोडायचे आहेत.
सर्वात वरच्या डाव्या छोट्या चौकोनापासून सुरुवात करायची. त्याला आपण सुरुवातीचा चौकोन म्हणूया. सुरुवातीच्या चौकोनाच्या शेजारील एखाद्या चौकोनाचा रंग खाली दिलेल्या रंगीत वर्तुळातून निवडायचा. मग सुरुवातीचा चौकोन व शेजारील चौकोन यांचा रंग एकच होईल व ते जोडले जातील. अश्या प्रकारे चौकोन जोडत - जोडत सर्व चौकोनांचा रंग एकच होईपर्यंत खेळायचे.
या सूचना लपविण्यासाठी वरच्या त्रिकोणी चिन्हावर टिचकी मारा.