या खेळामध्ये तुम्ही मनात एक गुपित धरायचे. हे गुपित म्हणजे - वाक्य, म्हण, वाक्प्रचार, घोषणा, शब्द, कवितेची ओळ, सुविचार, नाव यांसारखे काहीही असू शकेल. नावामध्ये प्रसिद्ध व्यक्तींची, ठिकाणांची, चित्रपटांची, पुस्तकांची नावे, इत्यादी असू शकेल. तर हे मनात धरलेले गुपित खाली दिलेल्या चौकटीमध्ये टाकायचे व एंटर बटनावर टिचकी मारायची. ऍप तुम्हाला एक विशिष्ट लिंक बनवून देईल. हि लिंक तुम्ही तुमचे मित्र, कुटुंबीय, सोशल मिडिया यांना द्यायची. ती लिंक उघडणाऱ्याला शब्दवेध हा खेळ सादर होईल. तो खेळ खेळून तुमच्या मनात धरलेली गोष्ट त्यांना ओळखता येईल.
तुमच्या गुपिताबरोबर तुम्ही त्याचा सुगावा (Hint) सुद्धा देऊ शकता. सुगावा आणि तुमचे नाव ऐच्छिक आहे.
चला तर मग, मनात एक गुपित धरूया.
तुमची लिंक येथे दिसेल